महाराष्ट्र कुंभार समाज सामाजिक संस्थेची कार्यकारिणी जाहीर !

प्रदेश सरचिटणीस पदी विलास गुडेकर पत्रकार आघाडी उपाध्यक्षपदी दिलीप हिंदळेकर यांची निवड

कणकवली (प्रतिनिधी) : श्री क्षेत्र साईनगर शिर्डी येथे महाराष्ट्र कुंभार समाज सामाजिक संस्थेची सर्व साधारण सभा रविवारी झाली. या सभेत संस्थेच्या प्रदेश अध्यक्ष पदी रमाकांत क्षिरसागर (नाशिक) यांची एकमताने निवड करण्यात आली. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील यशवंत शेदुलकर यांची प्रदेश उपाध्यक्ष पदी, कणकवली तालुक्यातील कलमठ येथील सामाजिक कार्यकर्ते विलास गुडेकर यांची प्रदेश सरचिटणीसपदी व पत्रकार आघाडी उपाध्यक्ष पदी कणकवलीतील ज्येष्ठ पत्रकार दिलीप हिंदळेकर यांची निवड करण्यात आली आहे.

तसेच महाराष्ट्र प्रदेश क्रीडा अध्यक्ष म्हणून रामदास सांगवेकर ,संपर्क प्रमुख म्हणून प्रा.गणपत शिरोडकर यांची निवड झाली आहे. महाराष्ट्र प्रदेश कुंभार समाज संघटनेत सिंधुदुर्गातील कुंभार बांधवांची वर्णी लागल्यामुळे त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सतिश दरेकर यांनी पुढील पाच वर्षांसाठी नवीन कार्यकारिणी नियुक्ती केली आहे. त्यात कोकण विभागासाठी सुध्दा पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये महेश सायकर( प्रदेश कार्याध्यक्ष ), यशवंत शेदुलकर( प्रदेश उपाध्यक्ष),मोहन कुंभार ( प्रदेश उपाध्यक्ष), संतोष चौलकर ( प्रदेश सरचिटणीस),राम पान्हेरकर(प्रदेश उपाध्यक्ष), विलास गुडेकर(प्रदेश सरचिटणीस),रविंद्र रसाळ सर (प्रदेश सरचिटणीस), रमेश साळवी(प्रदेश सरचिटणीस), संदिप पाटील (प्रदेश युवा अध्यक्ष), राजेंद्र मांगरूळकर(सरचिटणीस ), प्रकाश साळवी (कोकण विभागीय अध्यक्ष), जितेंद्र पाभरेकर(कोकण विभागीय कार्याध्यक्ष),वसंत कुंभार (कोकण विभाग कोषाध्यक्ष),रमाकांत गोरे (कोकण विभाग सचिव), नितीन कुंभार (मुर्तीकार आघाडी अध्यक्ष ), रामदास सांगवेकर (क्रीडा आघाडी अध्यक्ष) ,दिलीप हिंदळेकर (पत्रकार आघाडी उपाध्यक्ष), दिनेश बिरवाडकर (वधू -वर आघाडी प्रमुख),गणपत शिरोडकर (संपर्क प्रमुख) ,मधुकर सोनावळे (ठाणे -पालघर संपर्क प्रमुख), अनिल चिपळूणकर(मुंबई संपर्क प्रमुख),गजानन चौलकर (उपाध्यक्ष रायगड जिल्हा), स्वप्निल केंबुळकर(युवा आघाडी संपर्क प्रमुख ठाणे)या सर्वांची निवड करण्यात आली आहे.

error: Content is protected !!