संदेश पारकर यांची प्रचारयंत्रणा सांभाळलेले प्रद्युम्न मुंज भाजपात
माजी नगराध्यक्ष समीर नलावडेंच्या नेतृत्वाखाली केला पक्षप्रवेश
कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरातील उबाठा चा बालेकिल्ला असलेल्या वॉर्ड नं ६ मधील बाजारपेठ भागातील युवा कार्यकर्ता प्रद्युम्न मुंज यांनी पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत ओम गणेश निवासस्थानी आपल्या सहकारी युवा सैनिकांसह भाजपात प्रवेश केला. माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या नेतृत्वाखाली मुंज यांनी आज भाजपात प्रवेश केला. प्रद्युम्न यांच्यासह वृषभ मेणकुदळे,रोशन मांगले,सुरज ओरसकर,रुद्र सापळेहर्षल बिडये,जयेश मुंजतुषार मेणकुदळे,जयेश बिडयेनिखिल लोकरे,मंदार पोटफोडेविनायक तेली,जयेश जावडेकरभगीरथ प्रजापती,दिनेश सोलंकी आकाश बिडये,कल्पेश सावंत आदींनी भाजपात प्रवेश केला.
प्रद्युम्न मुंज यांच्या पक्षप्रवेशाने कणकवली बाजारपेठ भागात भाजपची ताकद वाढली असून उबाठा सेनेला हा धक्का आहे. यावेळी भाजपा माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री,अण्णा कोदे,साकेडी उपसरपंच प्रज्वल वर्दम आदी उपस्थित होते.