मंत्री नितेश राणे यांचा उबाठा सेनेला बिडवाडी विभागात जोरदार धक्का
सहा ग्रामपंचायत सदस्यांनी उबाठाला सोडचिट्टी देत भाजपात प्रवेश
शेकडो कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी भाजपात केला पक्षप्रवेश
कणकवली (प्रतिनिधी) : मत्स्य व बंदर विकास मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांनी कणकवली तालुक्यातील ठाकरे शिवसेनेला जोरदार धक्का दिला आहे. बिडवाडी उपसरपंच सुदाम तेली यांनी मंत्री नितेश राणे यांच्या कार्यकर्तृत्वावर विश्वास ठेवून गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सहकारी ग्रामपंचायत सदस्यांसह शेकडो ग्रामस्थांच्या उपस्थिती उबाठा सेनेच्या असंख्य कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांसमवेतभाजपामध्ये प्रवेश केला आहे.
यावेळी त्याच्या समवेत ग्रा.प.सदस्य प्रकाश लाड , ग्रा.प सदस्य संदीप चव्हाण , ग्रा.प सदस्य श्याम कदम ,ग्रा.प सदस्य आर्या राणे , ग्रा.प सदस्य नंदा सावंत , ग्रा.प.सदस्य प्रतीक्षा तांबे आदींसह ठाकरे शिवसेनेच्या शेकडो कार्यकर्ते पदाधिकारी यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला आहे. कणकवली येथे ओम गणेश निवासस्थानी हा पक्षप्रवेश झाला.