सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे नूतन राज्य शिक्षक नेते पदी निवड झालेले उदय शिंदे, राज्याध्यक्ष विजय कोंबे, राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर यांचा भव्य सत्कार सोहळा व शिक्षक समितीचे सर्व प्राथमिक शिक्षक पतपेढी संचालक यांचा सन्मान कार्यक्रम, कार्यकर्ता चेतना मेळावा दि. 31 मार्च, 2023 रोजी सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढी सभागृह सिंधुदुर्गनगरी येथे दु 2.30 ते 5.00 या वेळात संपन्न होणार असल्याचे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष नारायण नाईक यांनी प्रसिद्ध पत्रकाद्वारे सांगितले आहे.
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे 17 वे त्रैवार्षिक राज्य महाअधिवेशन वेंगुर्ला येथे संपन्न झाले.या अधिवेशन मध्ये नूतन राज्य शिक्षक नेते पदी निवड झालेले उदय शिंदे, राज्याध्यक्ष पदी विजय कोंबे, राज्य सरचिटणीस पदी राजन कोरगावकर यांचा भव्य सत्कार प्राथमिक शिक्षक समिती शाखा सिंधुदुर्ग च्यावतीने आयोजित करण्यात आला आहे. याच कार्यक्रमात शिक्षक समीतीचे विद्यमान सर्व संचालक यांचाही सन्मान कार्यक्रम होणार आहे.
शिक्षक संघटना चळवळीचे महत्त्व सध्याच्या नवीन शैक्षणिक धोरणात काय आहे. संघटन कसे असावे याबाबत कार्यकर्ता चेतना मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यास सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील प्राथमिक शिक्षक बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन प्राथमिक शिक्षक समितीच्यावतीने जिल्हाध्यक्ष नारायण नाईक व जिल्हासरचिटणीस सचिन मदने यांनी केले आहे. या कार्यक्रमास शिक्षक समितीचे राज्य, जिल्हा व तालुका पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.