चौके (प्रतिनिधी) : हरमल गोवा येथे दि. 26 मार्च, 2023 रोजी कर्नाटक राज्याचे माजी मुख्यमंत्री श्री वीरप्पा मोईली यांच्या नॅशनल रुरल डेव्हलपमेंट फाऊंडेशन, बेळगाव आयोजित राष्ट्रीय सेवा पुरस्कार सोहळा 2023 संपन्न झाला. यावेळी कर्नाटक राज्याचे माजी केंद्रीय मंत्री रत्नमाला सावनूर यांच्या मालवण तालुक्यातील वराडकर हायस्कूलचे शिक्षक हस्ते प्रकाश कानूरकर यांचा “आदर्श शिक्षक सेवा पुरस्कार” देऊन सन्मान करण्यात आला. सन्मानित व्यक्तींचे ढोल ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले व पुरस्कार म्हणून सन्मान चिन्ह, सन्मान पत्र, म्हैसूरी फेटा, व चंदनाचा कायमस्वरूपी हार देऊन गौरविण्यात आले. गोवा राज्याचे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या हरमल पंचक्रोशी शिक्षण मंडळाच्या सभागृहात संपन्न झालेल्या, महाराष्ट्र, गोवा कर्नाटक आणि गुजरात राज्यातील औद्योगिक, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्यात आले.
प्रकाश कानूरकर हे वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टा येथे गणित विभाग प्रमुख, तसेच गणित विज्ञान विषयाचे अध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी इयत्ता दहावी सेमी वर्गाचा शिक्षकी सेवेत नियुक्ती झाल्यापासून 100% निकाल अखंडितपणे लावला आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षा, एस टी एस परीक्षा, यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतात. विविध पर्यावरण विषयक उपक्रमात सहभाग असतो. सिंधुदुर्ग जिल्हा विज्ञान मंडळाचे सचिव म्हणून ही विविध उपक्रम राबविण्यात कायम अग्रेसर असतात. अशा या उपक्रमशील शिक्षकांचा सन्मान झालेबद्दल पंचक्रोशीतील लोक व सर्व मित्रमंडळी कौतुकांचा वर्षाव करत आहेत.
या समारंभात कर्नाटक राज्याच्या मा. केंद्रीय मंत्री रत्नमाला सावनूर, बॅरिस्टर अमरसिंह पाटील, (खासदार, बेळगाव), राजू शिंगाडे (मा. महापौर कोल्हापूर महानगरपालिका), आजरा कारखान्याचे संचालक संपत बापू पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. कानुरकर यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ, कट्टा चे विश्वस्त सेवानिवृत्त कर्नल शिवानंद वराडकर, ॲड. सोनू पवार, अध्यक्ष अजयराज वराडकर, उपाध्यक्ष शेखर पेणकर, उपाध्यक्ष आनंद वराडकर, सचिव सुनील नाईक, सचिव विजयश्री देसाई, शालेय समिती चेअरमन सुधीर वराडकर व सर्व संचालक पदाधिकारी तसेच वराडकर हायस्कूल कट्टाचे मुख्याध्यापक संजय नाईक व इतर सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.