नांदगाव (प्रतिनिधी) : विविध सेवा सहकारी सोसायटी कासार्डे- पियाळी चेअरमन पदी भाजप प्रणित पॅनलचे कासार्डे गावचे दीपक सावंत यांची निवड करण्यात आली असून व्हाईस चेअरमन पदी पियाळीचे रविंद्र ऊर्फ बाबू घाडीगांवकर यांची निवड करण्यात आली. काही दिवसांपूर्वीच झालेल्या संचालक पदाच्या निवडणुकीत भाजप पुरस्कृत पॅनलचे सर्व सदस्य बिनविरोध निवडून आल्यानंतर आज चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाची निवड करण्यात आली.
यावेळी उपस्थित नवनिर्वाचित चेअरमन दिपक सावंत व व्हाईस चेअरमन रविंद्र घाडी याची माजी जि.प. सदस्य संजय देसाई याच्या उपस्थित पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले.यावेळी माजी उपसभापती प्रकाश पारकर ,तंटामुक्त अध्यक्ष राजकुमार पाताडे ,माजी सरपंच संतोष पारकर, उद्योजक प्रणिल शेटये,भाजपा तालुका अध्यक्ष संतोष कानडे ,कासार्डे सरपंच निशा नकाशे , उपसरपंच गणेश पाताडे, पियाळी उपसरपंच संजय ढवण ,खरेदी विक्री संघाचे संचालक श्रीपत पाताडे ,रवींद्र पाताडे ,पोलीस पाटील सुनील पवार , डॉ.प्रकाश जांभिलकर ,सोसायटीचे नवनिर्माण निर्वाचित सदस्य विनोद बंदरकर ,रवींद्र घाडी, दीपक गुरव, विजय कोलते ,नितीन लाड, तेजराव घोळवे , शांताराम जाधव ,सहदेव मस्के, माधवी पाळेकर ,ललिता मिस्त्री, ग्रामपंचायत सदस्य सहदेव खाडेये,प्रणय जोशी ,श्रद्धा शेलार ,रिद्धी मुणगेकर , किशोर कुडतरकर, दयानंद पाताडे ,रवींद्र पांचाळ ,बाबू भोगले,बाळाराम गायकवाड ,शरद शेलार , सोसायटी सचिव रश्मी महाडिक, सुरेंद्र पाताडे आदी उपस्थित होते. यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून रविकिरण खांडेकर यांनी काम पाहिले.