सेवानिवृत्त प्राथ. शिक्षकांचा स्नेहमेळावा ६ मार्चला

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक असोशिएशन शाखा मालवण मधील प्राथमिक शिक्षण सेवेतून सेवानिवृत्त झालेले प्राथमिक शिक्षक, पदवीधर, मुख्याध्यापक आणि विस्तार अधिकारी यांचा स्नेहमेळावा विजय चौकेकर तालुकाध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली खाली गुरुवार दि. ०६ / ०३ / २०२५ रोजी सकाळी ०९ वा. जानकी मंगल कार्यालय कुंभारमाठ जरीमरी येथे आयोजित करण्यात आला आहे.

या मेळाव्यास वर्षा झालटे तहसिलदार मालवण, प्रविण कोल्हे पोलिस निरीक्षक मालवण, प्रफुल्ल वालावलकर गट विकास अधिकारी पं. स. मालवण, संजय माने गटशिक्षणाधिकारी पं स मालवण हे उपस्थित राहून शासकिय मार्गदर्शन करणार आहेत. प्रकाश चव्हाण डॉ. दीक्षित जीवनशैली समन्वयक हे डॉ दीक्षित जीवनशैली याबाबत मार्गदर्शन करणार आहेत : मा स्नेहमेळाव्याला जिल्हा अध्यक्ष सावळाराव अणावकर हे उद्घाटक म्हणून उपस्थित राहाणार आहेत . तसेच जिल्हा उपाध्यक्ष प्रकाशभाई दळवी, ना. य. सावंत, भरत आळवे तसेच जिल्हा सचिव सुंदर, जिल्हा सदस्य कृष्णा, प्रताप बागवे तसेच सर्व तालुका अध्यक्ष उपस्थित रहाणार आहेत.

यावेळी चालू वर्षात सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांचा तसेच ३१ मार्चला वयाची ७५ पूर्ण केलेल्या शिक्षकांचा सत्कार करण्यात येणार आहे. दुपारच्या सत्रात नुतन कार्यकारीणीची निवड करण्यात येणार आहे. तरी मालवण तालुक्यातील सर्व सेवानिवृत्त प्राथ . शिक्षकांनी वेळीच उपस्थित रहावे असे आवाहन अध्यक्ष विजय चौकेकर आणि सचिव आनंद धुत्रे यांनी प्रसिद्धी माध्यमातून केले आहे.

error: Content is protected !!