शिवसेना कणकवली तालुक्याच्या वतीने उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळे वाटप
कणकवली (प्रतिनिधी) : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सचिव, लोकप्रिय माजी खासदार विनायक राऊत साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्त शिवसेना कणकवली तालुक्याच्या वतीने कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळे व बिस्कीट वाटप करण्यात आले. यावेळी कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर उपस्थित होते. यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, तालुकाप्रमुख कन्हैया पारकर, महिला जिल्हाप्रमुख नीलम पालव, राजू राठोड, उत्तम लोके, जय शेट्ये, योगेश मुंज, मंगेश राणे, अनुप वारंग, धीरज मेस्त्री, विलास गुडेकर, अजित काणेकर, महेश कोदे, सुहास सावंत, लक्ष्मण हाण्णीकोड, चव्हाण, आशिष मेस्त्री, महिला आघाडी माधवी दळवी, संजना कोलते, वैदेही गुडेकर, धनश्री मेस्त्री आदी महिला व शिवसैनिक उपस्थित होते.
