अवघड वळणावर एस टी बसचा ब्रेक फेल ; बस गटारात कलंडून अपघात

वैभववाडी (प्रतिनिधी) : हेत मौदे दरम्यान एका अवघड वळणावर एस टी बसचा ब्रेक फेल झाल्यामुळे एस बस गटारात कलंडून अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. मात्र एस टी बसचे मोठे नुकसान झाले आहे. हा अपघात शुक्रवारी सायंकाळी ४. ३० वाजण्याच्या सुमारास घडला. मात्र २४ तास उलतूनही बस काढण्यात आली नव्हती.

कणकवली आगाराची कणकवली मौदे ही दुपारी २ वाजता सुटणारी एस टी बस कणकवली फोंडा, वैभववाडी वेंगसर मार्गे मौदे अशी जाते. अरुणा धरण प्रकल्पामुळे हेत ते मौदे असा नवीन रस्ता तयार करण्यात आला आहे. या मार्गावर अनेक अवगड वळणे, अरुंद रस्ता आहे. अशाच एका अवघड वळणावर अचानक बसचा ब्रेक फेल झाला. एका बाजूला धरणातील पाणी तर दुसऱ्या बाजूला गटर व त्याला लागून दरड अशा परिस्थित बस मधील प्रवाशांना वाचविण्यासाठी चालकाने बस दरडीच्या साईडला गटारात घातली. सुदैवाने यात कोणालाही दुखापत झाली नाही. मात्र एस टी बस चे मोठे नुकसान झाले आहे. बस अपघातग्रस्त होऊन २४ तास झाले तरी बस त्याच ठिकाणी होती. त्यामुळे एस टी प्रशासनाच्या कारभाराची नागरिकांमध्ये चर्चा होती.

error: Content is protected !!