मुस्लिम समाजाला नितेश राणे यांनी भरघोस निधी उपलब्ध करून दिला
बाहेरून येणारे काही वातावरण बिघडवतात
कणकवली (प्रतिनिधी) : राज्याचे मत्स्य विकास बंदर तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे हे अल्पसंख्याक मुस्लिम समाजाच्या विरोधात नसून ते सातत्याने मुस्लिम समाजाच्या बाजूने उभे राहिले आहेत असे मत भाजपचे कणकवली तालुका अल्पसंख्याक समाज अध्यक्ष रज्जाक बटवाले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे व्यक्त केले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुस्लिम समाज हा सर्व समाजाबरोबर गुण्यागोविंदाने राहतात व सर्व सण मिळून साजरे करतात.
जिल्ह्यातील काही घटना घडल्या की, ते पालकमंत्री नितेश राणे यांनी केले असे जे विरोधक बोंबाबोंब करीत आहे ते त्यांनी स्वतः वस्तुस्थिती समजावून घेणे व नंतर प्रसिद्ध करावे आज पर्यंत त्यांनी मुस्लिम अल्पसंख्याक समाजाच्या लोकांना भरघोस निधी उपलब्ध करून दिला आहे. सामाजिक शैक्षणिक व आरोग्य व आथिर्कदृष्ट्या मदत केली आहे.
नितेश राणे हे मुस्लिम समाजाच्या विरोधात असते तर त्यांनी अनेक लोकांना मदत केली असती का ? मुस्लिम समाज हा नितेश राणे यांच्या पाठीशी आहे स्थानिक मुस्लिम समाज हे आपल्या जिल्ह्यात गुण्यागोविंदाने राहतात परंतु जे बाहेरुन येऊन इथे स्थायिक झाले आहे व व्यवसाय निमित्ताने आले ते वातावरण बिघडवत आहे. राणे कुटुंबीय हे कधीही मुस्लिम समाजाच्या विरोधात नाहीत ते सर्व सणांना ईद ,उर्स अशा कार्यक्रमांना उपस्थित राहतात.
जे विरोधक बोंब मारत आहे त्यांनी अल्पसंख्याक समाजाच्या लोकांना किती मदत केली व विकास निधी किती मंजूर केला ते जाहीर करावे फक्त बोंबाबोंब करून अल्पसंख्याक समाजाची मतदान कसे मिळेल अशी सहानुभूती करीत आहे. पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्ह्यातील अल्पसंख्याक समाजातील लोकांना त्रास दिला किंवा त्यांच्यावर कारवाई केली असे एक तरी लेखी दाखवावे राणे पालकमंत्री झाले ते विरोधकांच्या पोटात गोळा उठला आहे त्यांना ते पचवत नाही जे विरोधक आरोप करीत आहे त्यांनी विकासावर बोलावे त्यांची भेट घ्यावी व आपले जे कार्यकर्ते आहे त्यांना सांभाळावे असा टोला लगावला. मुस्लिम अल्पसंख्याक समाज हा नितेश राणे यांच्या पाठीशी ठाम पणे उभे आहे व विरोधकांनी अफवा पसरवू नये असे ही मत शेवटी भाजपचे कणकवली तालुका अल्पसंख्याक समाज अध्यक्ष रज्जाक बटवाले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे व्यक्त केले आहे
