फोंडाघाट (प्रतिनिधी) : फोंडाघाट बाजारपेठेतील युवा इलेक्ट्रिकल व्यापारी प्रमोद पुरुषोत्तम गव्हाणकर (५२वर्षे) यांचे प्रदीर्घ आजाराने आज रोजी राहत्या घरी दुःखद निधन झाले. मिश्किल आणि समजूतदार स्वभाव यामुळे ते मित्र परिवारात सुपरिचित होते. फोंडाघाट व्यापारी संघाच्या तसेच बालगोपाळ मंडळाच्या बहुतांश कार्यक्रमात ते सहभागी होत. त्यांच्या जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांचे पश्चात पत्नी, एक मुलगी,एक मुलगा, भाऊ – बहिणी असा मोठा परिवार आहे. फोंडा पेठेतील बाळा गव्हाणकर यांचे ते बंधु होत. पेठेतील दुकाने बंद ठेऊन, वैकुंठभूमीत सर्वांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.
