फोंडाघाट (प्रतिनिधी) : फोंडाघाट येथील हेमंत मोहन फोंडेकर यांची सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळा च्या जिल्हा युवा समिती सहसचिवपदी निवड करण्यात आली आहे. मंडळाचे जिल्हाध्यक सुजित जाधव, सचिव चंद्रसेन पाताडे यांनी हेमंत फोंडेकर यांना नियुक्तीपत्र दिले. हेमंत फोंडेकर हे चर्मकार समाज संघटनेचे अत्यंत क्रियाशील कार्यकर्ते असून त्यांनी याआधी कणकवली चर्मकार समाज उन्नती मंडळ तालुका उपाध्यक्ष,संत रोहिदास चर्मकार समाज उत्कर्ष मंडळ फोंडाघाट अध्यक्षपदी काम केले आहे. समाजाप्रती कळवळा असलेला कार्यकर्ता म्हणून हेमंत फोंडेकर यांची ओळख असून या निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे.
