जीवन आनंद संस्था संचालित, पणदूर च्या संविता आश्रमात “समाज सेवा प्रशिक्षण” वर्गाचे आयोजन

दि. ४ मे २०२५ ते १८ मे २०२५ पर्यंत चालणार प्रशिक्षण वर्ग

खारेपाटण (प्रतिनिधी) : कमिटेड अँक्शन फाँर रिलीफ अँण्ड एज्युकेशन (केअर) संस्थे मार्फत १५ दिवसाचा निवासी समाज सेवा प्रशिक्षण वर्ग रविवार दी.४ मे ते १८ मे २०२५ या कालावधीत जीवन आनंद संस्था संचालित संविता आश्रम,पणदूर तालुका कुडाळ येथे आयोजित करण्यात आले असून सलग १५ दिवस पूर्णवेळ निवासी प्रशिक्षण वर्ग घेण्यात येणार आहेत.

‘कमिटेड अँक्शन फाँर रिलीफ अँण्ड एज्युकेशन(केअर )” ही संस्था गेली २२ वर्षाहून अधिककाळ समाजातील युवक-युवतींना आणि सामाजिक कार्याच्या पध्दती समजून घेवू इच्छीणा-या कोणत्याही वयाच्या प्रौढ व्यक्तींना समाजकार्य प्रमाणपत्र कोर्स च्या माध्यमातून प्रशिक्षण देवून व्यक्ती आणि समुहांचे प्रश्न सोडविण्याच्या कामात कृतीप्रवण करण्याचे कार्य करीत आहे.या समाज सेवा प्रशिक्षणात समाजसेवेशी निगडित समाजातील वंचितांचे प्रश्न व त्यावरील उपाययोजना, व्यक्ती – समूह व सामुदायिक कार्य, भारतीय संविधान, मुलभूत अधिकार -कर्तव्ये, पोलीस कायदे , समाजसेवी संस्थाची सोसायटी व ट्रस्ट म्हणून नोंदणी प्रक्रीया, समुपदेशन इ. अनेक विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.   
 
समाजसेवा प्रशिक्षण अभ्यासक्रमात विविध विषयांवरील व्याख्याने, प्रात्यक्षिके , क्षेत्रकार्य (फिल्डवर्क), लघुप्रबंध, वैयक्तिक व गट सादरीकरण व रोजनिशी या द्वारे समाजसेवा विषयावर सहभागींना प्रशिक्षित करण्यात येणार आहे. केअर संस्थेच्या समाज सेवा प्रशिक्षण वर्गाची ही ५८ वी बँच आहे. या प्राशिक्षण वर्गात युवक युवती, गृहिणी, महाविद्यालयीन विद्यार्थी, सेवा निवृत्त व्यक्ती तसेच नोकरदार वर्ग यांपैकी कोणाही इच्छुक व्यक्तीस सहभागी होता येणार आहे.तर व्यक्तिमत्व विकास आणि सामाजिक प्रश्न सोडवणूकीचे भान येण्यासाठी उपयुक्त असे हे प्रशिक्षण असल्याचे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले आहे.

या समाजसेवा प्रशिक्षण अभ्यासक्रमाचे शुल्क रू.३000/- इतके ठेवण्यात आले असून या प्रशिक्षन वर्गात मर्यादित प्रवेश असल्याने समाजसेवा प्रशिक्षण वर्गसबंधी अधिक माहिती व नावनोंदणीसाठी इच्छुकांनी संस्थेचे अध्यक्ष संदिप परब – ९८२०२३२७६५, रामचंद्र अडसुळे – ९९६७००००८१, आनंद राजू – ७३०३४१९७०४ यांच्याशी त्वरित संपर्क साधावा.असे आवाहन जीवन आनंद संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!