तृप्ती डिजिटल वर्क्सच्या तृप्ती आणि रुपाली कोरगावकर यांना पितृशोक
कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरातील नाथ पै नगर येथील रहिवासी व स्क्रीन पेंटिंग व जुन्या पिढीतील फोटोग्राफर काशीराम उर्फ अरुण गोविंद कोरगावकर (७८) यांचे सोमवारी रात्री अल्पशा आजाराने निधन झाले. मूळ कसवण गावकरवाडी येथील अरुण कोरगावकर हे गेले अनेक वर्ष व्यवसायानिमित्ताने कणकवलीत राहत होते. तहसीलदार कार्यालयामागे तृप्ती डिजिटल वर्क्स या नावाचे त्यांचे दुकान आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुली, दोन जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. मंगळवारी दुपारी कणकवली स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. स्क्रीन पेंटिंग स्पेशालिस्ट कुमारी तृप्ती व रुपाली यांचे ते वडील होत.