खारेपाटण पोलिसांची अवैध धंद्या विरुद्ध कारवाई

खारेपाटण मध्ये मटका तर नडगिवे गावात दारू धंद्यावर छापा टाकून मुद्देमाल केला जप्त

खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील खारेपाटण व नडगिवे या गावात खारेपाटण पोलीस दूरशेत्राचे पोलीस अंमलदार चंद्रकांत माने यांच्या टीमने नुकताच येथील अवैद्यधंद्या विरोधात कारवाई करून मुद्देमाल जप्त केला. याबाबत अधिक वृत्त असे की खारेपाटण पंचक्रोशीमध्ये सद्या दारू धंदे व मटका जुगार जोरदार सुरू असून या अवैध चालनाऱ्या धांद्याविरोधात पोलिसांनी नुकतीच धडक कारवाई केली असून गुरवारी सायंकाळी ७.३० वा.खारेपाटण कोष्टीआळी येथील मंगेश गोविंद लोकरे वय ५० वर्षे यांचे वर अवैधरित्या मुंबई मटका जुगार घेताना मिळून आला असल्या मुळे त्यांच्यावर खारेपाटण पोलीस दूर शेत्राचे पोलीस अंमलदार चंद्रकांत माने यांनी कारवाई करून सुमारे १७२०/- रुपयांचा मुद्दे माल जप्त केला आहे.तर नडगिवे, बांबरवाडी येथील मघेश दिलीप पाटील वय -३७ वर्षे याचे वर अवैध रित्या गोवा बनावटीची दारू विक्री करताना गुरवारी रात्री ८.३० वाजता आढळून आल्याने कारवाई करण्यात आली.यावेळी त्यांचेकडे सुमारे १७२० /- रुपयाचा सापडलेला मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. खारेपाटण व नडगिवे येथील अवैध धंद्याच्या विरोधात करण्यात आलेल्या कारवाईत खारेपाटण पोलीस दूरशेत्राचे अंमलदार चंद्रकांत माने,पोलीस नाईक रुपेश गुरव,महिला पोलिस कॉन्स्टेबल सुप्रिया भागवत यांनी सहभाग घेतला.

error: Content is protected !!