निराधार, दु:खितांच्या सेवा सुश्रूषेतून जीवनातील खरा आनंद आणि समाधान मिळते – संदिप परब

कणकवलीतील वार्धक्याने जर्जर व निराधार आजोबा संविता आश्रमात दाखल

संदिप परब यांनी रस्त्यावरच केली आजोबांची सेवासुश्रूषा

खारेपाटण (प्रतिनिधी) : जीवन आनंद संस्थेचे अध्यक्ष संदिप परब आणि त्यांचे सहकारी कार्यकर्त्यांनी नुकतेच कणकवली येथील वार्धक्याने जर्जर आणि निराधार असलेल्या बाळू गणपत झोरे या आजोबांना संस्थेच्या संविता आश्रम मधे दाखल केले.असून यावेळी बोलताना,”निराधार, दु:खितांच्या सेवा सुश्रूषेतून जीवनातील खरा आनंद आणि समाधान मिळते.” अशी भावना संस्थेचे अध्यक्ष संदिप परब यांनी यावेळी व्यक्त केली.

कणकवली एसटी डेपो समोरील लक्ष्मी लॉज जवळ निराधार स्थितीत आढळून आलेल्या या आजोबांबददल सावंत ऑपटिशिअन यांनी संदिप परब यांना फोनवरून माहिती दिली. त्यानंतर त्यांनी तात्काळ दखल घेवून आजोबांना आश्रमात दाखल केले.कणकवली एस. टी. स्टॅंड समोर६२ वर्षे वयाचे आजोबा उन्हात तीन दिवसांपासुन पडलेले होते. त्यांना नीट उठता बसताही येत नाही. संदिप यांनी स्वतः रस्त्यावरच आजोबांची दाढी केली. त्यांचे केस कापले .स्वच्छ आंघोळ घातली. आणि त्यानंतर कणकवली पोलीसांच्या पत्राद्वारे , मदतीने व सहकारीनच्या सहाय्याने जीवन आनंद संस्था संचलित पणदूर येथील संवीता आश्रम मध्ये आजोबांना दाखल केले.

यावेळी आशिष कांबळी, महाबळेश्वर कामत, कमलेश मोरे, क्रिष्णा एक्का, हर्ष ह्यांनी त्यांना मदत केली.समाजातील संवेदनशील नागरिक, देणगीदार, हितचिंतक आदी सर्वांच्या सहकार्यामुळे जीवन आनंद संस्था निराधार, वंचित बांधवांच्या सेवेचे कार्य करीत आहे. असे संदिप परब यांनी सांगून मानवतेच्या या कार्यात सहाय्यभूत होणा-या सर्वांचे आभार मानले.

error: Content is protected !!