माजी नगरसेवक उमेश वाळके सह मुलगा सोहम वर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल

क्रीडांगण जमीन मोजणीला विरोध करत डोळ्यात मसाला फेकण्याची दिलेली धमकी भोवली

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरातील क्रीडांगण मोजणीसाठी गेलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना आडकाठी आणत डोळ्यात मसाला फेकण्याची धमकी देत शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी कणकवली पोलीस ठाण्यात माजी नगरसेवक उमेश वाळके यांच्यासह त्यांचा मुलगा सोहम वाळके विरोधात भा. दं. वि.353 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज कणकवली शहरातील मुडेडोंगरी येथील परिसरात नियोजित क्रीडांसंकुल च्या जमीन मोजणीसाठी शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांचे पथक गेले होते.तेथे जमीनमालक असलेल्या उमेश वाळके , त्यांचा मुलगा सोहम वाळके यांनी शासकीय कामात अडथळा आणल्याची फिर्याद कणकवली नगरपंचायत चे कर्मचारी मनोज धुमाळे यांनी कणकवली पोलीस ठाण्यात दिली आहे.त्यानुसार उमेश वाळके व सोहम वाळके यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

error: Content is protected !!