एनएमएमएस परीक्षा गुणवत्ता यादीत एसएमएसचे सुयश

कणकवली (प्रतिनिधी) : परीक्षा शिक्षण मंत्रालय, शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग, भारत सरकार द्वारे घेण्यात आलेल्या एनएमएमएस परीक्षा 2024 ची गुणवत्ता यादी नुकतीच जाहीर करण्यात आली या गुणवत्ता यादीत एस एम पहायस्कूल कणकवली येथील राजलक्ष्मी संग्राम पाटील व मैथिली सागर चव्हाण या दोन विद्यार्थिनी जिल्ह्यात अनुक्रमे 24 व 34 वा क्रमांक प्राप्त करून एनएमएमएस गुणवत्ता शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरल्या.

यानिमित्ताने कणकवली शिक्षण संस्था कणकवलीच्या वतीने सचिव डी एम नलावडे यांनी दोन्ही विद्यार्थिनींचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. शाळाबाह्य परीक्षांमध्ये यशाची परंपरा कायम ठेवल्याबद्दल सचिव डी एम नलावडे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केलेच पण त्याबरोबर शिक्षकांचे सुद्धा कौतुक केले. ही यशाची परंपरा अखंड ठेवण्यासाठी शुभेच्छाही दिल्या. याप्रसंगी मुख्याध्यापक जी एन बोडके, पर्यवेक्षक जी ए कदम, एनएमएमएस परीक्षा प्रमुख सौ पी पी पराडकर व मार्गदर्शन करणारे सर्व तज्ञ शिक्षक उपस्थित होते.

error: Content is protected !!