यशवंत गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक !
फोंडाघाट (प्रतिनिधी) : सिंधूदुर्ग टॅलेंट सर्च या परीक्षेत जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा फोंडाघाट – सुतारवाडी ने घवघवीत यश संपादन केले आहे. या परीक्षेत इयत्ता दुसरी मध्ये कु .खुशी हनुमंत लाड, कु. मानस महेश लाड, कु.वेदिका जयेश लाड. इयत्ता तिसरी मध्ये कु. धनश्री मंगेश फोंडेकर. इयत्ता चौथी मध्ये कु.वेदिका हेमंत फोंडेकर, कु. आर्या विश्वनाथ राणे, कु. कार्तिक मंगेश सुतार, इयत्ता सहावी मध्ये कु.चैतन्य अनिल लाड, कु. दुर्वा संजय लाड, कु. नेत्रा दिपक लाड, कु. वैदही देवेंद्र लाड, कु. मयुरेश मंगेश मेस्त्री. इयत्ता सातवी मध्ये कु. मंदार महेश लाड, कु. रिया विकास लाड, कु. अनन्या महेश नाधावडेकर, कु. पवन संदीप पाताडे इत्यादी विद्यार्थी उत्तीर्ण झाले. इयत्ता चौथी मधील कुमारी वेदिका हेमंत फोंडेकर या विद्यार्थिनीला ब्रॉझ मेडल प्राप्त झाले आहे.
या सर्व गुणवंत मुलांचे कौतुक शाळेमध्ये भेट घेऊन शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष हेमंत फोंडेकर, उपाध्यक्षा संजना लाड, सदस्य प्नाची सावंत, विशाखा लाड, प्रीती फोंडेकर, मानसी लाड, हनुमंत लाड यांजकडून अभिनंदन करण्यात आले. या सर्वांना मुख्याध्यापक संजय सावंत, दर्शना हुंबे, श्रीकृष्ण ठाणेकर व निलेश कडुलकर यांचे मार्गदर्शन लाभले. शाळेच्या या यशाबद्दल ग्रामस्थ, पालक यांजकडून अभिनंदन व समाधान व्यक्त करण्यात आले.












