भाजपा पडेल मंडल सरचिटणीस रामकृष्ण राणेंची टीका
देवगड (प्रतिनिधी) : देवगड – महाळुंगे- गडीताम्हाणे रस्त्या तसेच फणसगाव महाळुंगे रस्ताचे काम गेल्या काही दिवसापासून सुरु आहे या रस्त्याची मागणी गेली अनेक वर्षे ग्रामस्थांकडून होत होती याकरिता ग्रामस्थांनी निदर्शने आंदोलने संबदिताना भेटून निवेदने दिलीत एवढ्या अथक परिश्रमाणे सदर रस्ता तेव्हाचे केंद्रीय मंत्री नारायणराव राणे यांच्या प्रयत्नने मंजूर झाला आणि रस्त्याचे भूमिपूजन मात्र खासदार विनायक राऊत यांनी केले तेही भूमिपूजन गाडीताहमाने रस्त्याचे केले मात्र फणसगाव येथे रस्त्याचे काम सुरु झाल्यापासून या कामावर महाळुंगे ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांचे पूर्ण लक्ष आहे ते वेळोवेळी कॉन्टॅक्टर याला सूचना करीत असतात, मागील आठवड्यात गाडीतामाने रस्त्या बाबत सोशल मीडियावर आलेला प्रकार हा देखील जागृतीचा प्रकार होता त्याभागातील भाजपा पदाधिकारी अमित कदम यांनी कामाबाबत सर्वांचे लक्ष वेधले होते पण याला प्रसिद्धी मिळाल्या नंतर आयत्यावर येऊन दिखावा करण्याचे काम उभाटा सेनेच्या पदाधिकारी यांनी केला ग्रामस्थांची अनेक वर्ष्याची रस्त्याची मागणी विद्यमान खासदार राऊत कधी पूर्ण करू शकले नाहीत त्यामुळे अस्तित्व संपलेल्या उभाटाची अखेरची वळवळ आहे.
पालकमंत्री यांच्यावर आरोप करताना किमान एवढेतरी भान हवे कि काम प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर आहे निधी केंद्राकडून मिळत असतो त्यात पालकमंत्री यांचा कितपत हस्तक्षेप चालतो उगाच आरोप करायचे म्हणून करायचे उबाठा सेनेच्या या कृतीचे भारतीय जनता पार्टी पडेल मंडल यांच्या वतीने निषेध करतो असे भाजपा पडेल मंडल सरचिटणीस रामकृष्ण राणे यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
