खांबाळे येथील मोफत आरोग्य शिबिरात 75 रुग्णांची तपासणी

माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयाेजन

वैभववाडी (प्रतिनिधी) : शिवसेना माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या वाढदिवसानिमित्त खांबाळे येथे आयोजित मोफत आरोग्य शिबिरात 75 गरजू रुग्णांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

या आरोग्य शिबिराचे उद्घाटन सकाळी अकरा वाजता प्राथमिक शाळा खांबळे येथे करण्यात आले. यावेळी उबाठा सेनेचे उपजिल्हाप्रमुख नंदू शिंदे, तालुकाप्रमुख मंगेश लोके, सरपंच प्राजक्ता कदम,माजी सभापती लक्ष्मण रावराणे,उपसरपंच मंगेश गुरव, चेअरमन प्रवीण गायकवाड,माजी सरपंच विठोबा सुतार,गौरी पवार, संजय साळुंखे,माजी चेअरमन दीपक पवार, सुनील चव्हाण, माजी सैनिक राजाराम वळंजू, अशोक पवार,रसिका पवार,महादेव पवार,मिलिंद पवार,अमित कर्पे, हरेश जाईल,मंगेश कांबळे, सुरेश पवार,राजेंद्र देसाई,प्रसाद कदम,रामदास पवार यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या आरोग्य शिबिरात डॉ.रघुनाथ गावडे, डॉ.नीलम अनावकर, डॉ. आनंद तावडे, डॉ. रोशन चव्हाण यांनी रुग्णांची तपासणी केली. या शिबिरामध्ये संपूर्ण शारीरिक तपासणी, ॲक्युपेश्चर व फिजिओथेरपी उपचार,संगणकीय ऑटोमॅटिक जर्मन स्कॅनिंग पद्धती रुग्णांची तपासणी करण्यात आली. माजी आमदार उपरकर यांच्या वाढदिवसनिमित्त ग्रामीण रुग्णालय वैभववाडी येथील रुग्णांना फळे व बिस्कीट वाटप करण्यात आले…

error: Content is protected !!