उपळे येथील श्री सिध्देवर मंदिरातील १०० घंटा अज्ञात चोरट्याने चोरल्या

वैभववाडी (प्रतिनिधी) : उपळे येथील श्री.सिध्देवर मंदिरातील १०० घंटा, सुमारे १० हजार रुपये किंमतीच्या अज्ञात चोरट्याने चोरल्या आहेत.हा प्रकार सोमवारी सकाळी पुजारी अनंत संकपाळ यांच्या निर्दशनास आला.त्यांनी याबाबत सायकांळी उशिरा पोलीसांत तक्रार दिली आहे.पोलीसांनी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. महीनाभरात मंदीरातील घंटा चोरीला गेल्याची ही दुसरी घटना घडली आहे.चोरट्यांनी देवालये टार्गेट केल्यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.

उपळे येथील सिध्देश्वर राईमध्ये श्री.सिध्देश्वर मंदिर आहे.या मंदिरात जुन्या नव्या अशा एकुण ३४० घंटा बांधण्यात आलेल्या होत्या.दरम्यान पुजारी दर मंगळवारी सकाळी मंदिरात पुजाअर्चा आणि दिवाबत्ती करण्यासाठी जातात.७ एप्रिलनतंर काल १४ एप्रिल रोजी सकाळी पुजारी श्री.सकपाळ हे मंदिरात गेले असता त्यांना मंदिरातील काही घंटा चोरीस गेल्याचे निदर्शनास आले.ही माहीती त्यांनी गावातील इतर लोकांना सांगीतली.घंटा चोरीची पोलीसांना माहीती देण्यात आली.त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील अवसरमोल,पोलीस हवालदार आर.बी.पाटील,पोलीस कर्मचारी हरेष जायभाय,रणजित सावंत हे घटनास्थळी पोहोचले.चोरीस गेलेल्या घंटा दहा हजार रूपये किमंतीच्या होत्या.या घंटाची चोरी ७ एप्रिल ते १३ एप्रिल या कालावधीत झालेली आहे.या चोरीच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे अधिकारी वैभववाडीत दाखल झाले होते.

error: Content is protected !!