आजरा आंबोली मार्गावर अपघात : कोल्हापुरातील युवकाचा मृत्यू

चारचाकी वाहनाला स्पोर्ट्स बाईकची समोरासमोर धडक

कोल्हापूर प्रतिनिधी) : स्पोर्ट्स बाईक आणि कारची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात कोल्हापूर शहरातील युवक मृत्युमुखी पडला असून सिद्धेश रेडेकर असे मृत युवकाचे नाव आहे.

कोल्हापुरातील माळी कॉलनी टाकळा परिसरात राहणारा सिद्धेश रेडेकर हा युवक त्याच्या चौघा मित्रांसह स्पोर्ट्स बाईक घेवून २० एप्रिल रोजी पहाटे आंबोली इथं गेले होते. दरम्यान आंबोलिहून २० एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास चौघेजण आंबोलीहून परत कोल्हापूरला येत होते. यावेळी आजरा आंबोली मार्गावर माध्याळ ते देवर्दे दरम्यानच्या वळणावर कोल्हापूरहून सावंतवाडीच्या दिशेनं निघालेल्या चारचाकी वाहनाला सिद्धेश रेडेकर याच्या स्पोर्ट्स बाईकची समोरासमोर धडक झाली. ही धडक एवढी भीषण होती की चारचाकी वाहनाचे पुढील चाक निघून गेलं. या भीषण अपघातात सिद्धेश रेडेकर हा गंभीर जखमी झाला त्याला खाजगी रुग्णवाहिकेतून गडहिंगलज इथल्या रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र, अति रक्तस्त्राव झाल्यानं सिद्धेश याचा मृत्यू झाला. दरम्यान सायंकाळी मयत सिद्धेश याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सीपीआरमध्ये आणण्यात आला यावेळी त्यांचे नातेवाईक आणि मित्र परिवारानं मोठी गर्दी केली होती. या अपघाताची नोंद सीपीआर पोलीस चौकीत करण्यात आलीय.

error: Content is protected !!