पाकिस्तानी आतंकवाद्यांना भारतीय लष्कराने धडा शिकविण्याबद्दल व्यक्त केला आनंद
कणकवली (प्रतिनिधी) : पहलगाम येथील पर्यटकांवर पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर देत भारतीय लष्कराने आज मध्यरात्री पाकव्याप्त काश्मीर सह भारतातील आतंकवाद्यांच्या एकूण ९ अड्ड्यांवर सिन्दुर स्ट्राईक केला. भारताच्या सिन्दुर स्ट्राईक मध्ये शेकडो पाकपुरस्कृत आतंकवादी ठार झाल्याचे वृत्त आहे. भारतीय लष्कराने केलेल्या या सिन्दुर स्ट्राईक बद्दल संपूर्ण भारतात आनंद व्यक्त होत आहे. सिन्दुर स्ट्राईक बद्दल सिंधुदुर्ग जिल्ह्यातसुद्धा सर्वसामान्य भारतीय नागरिक आनंद व्यक्त करत आहेत. कणकवली शहरातील पटवर्धन चौकात आर बी बेकरी समोर सुद्धा फटाके फोडून सिन्दुर स्ट्राईक बद्दल कणकवली वासियानी आनंद व्यक्त केला. गौरव गवाणकर, संदीप खानोलकर, राजू गवाणकर, सागर चव्हाण, नेताजी घंटे, दीपक वारंग, शिशिर परुळेकर, नाना सापळे आदींनी फटाके फोडत आनंद व्यक्त केला.














