आचरा (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यात नव्याने हजर झालेले गटविकास अधिकारी उच्चस्थर नं १ श्याम चव्हाण यांची सेवानिवृत्त ग्रामसेवक संवर्ग महासंघ तालुका शाखा मालवण यांच्या वतीने आज बुधवारी ७ मे रोजी मालवण येथे सेवा निवृत्त ग्रामसेवक महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष हनुमंत प्रभू व अशोक ओटवणेकर यांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यांत आले. यावेळी विस्तार अधिकारी (ग्रा.प.) पी . डी.जाधव, विस्तार अधिकारी (कृषि) सुनील चव्हाण, व्ही. के. जाधव, गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.
सेवानिवृत्त ग्रामसेवक संवर्ग महासंघाला आपले नेहमीच सहकार्य राहील अशा प्रकारची ग्वाही नव्याने हजर झालेले गटविकास अधिकारी मा. श्याम चव्हाण यांनी दिली.












