सीईओ खेबूडकर ऑन ॲक्शन मोड

जि.प.च्या मुख्य वित्त अधिकारी राजश्री पाटील ना तडकाफडकी केले कार्यमुक्त

ओराेस (प्रतिनिधी) : वरिष्ठाना चुकीची माहिती देणे, त्यांची दिशाभूल करणे, त्यांच्या आदेशाचे पालन न करणे, कामात अनियमितता असा ठपका ठेवत जिल्हा परिषदेच्या मुख्य लेखा व वित्त अधिकारी राजश्री पाटील यांना मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबूडकर यांनी कार्यमुक्त केले आहे.प्रशिक्षणासाठी रवाना होण्यापूर्वी खेबूडकर यांनी ही कारवाई केल्यामुळे जिल्हा परिषदेत अनेकांचे धाबे दणाणले असून ‘आता कोणाचा नंबर अशी चर्चा सध्या जिल्हा परिषद अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये सुरु आहे. जिल्हा परिषदेच्या इतिहासात कॅफो ‘सारख्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याला तडका फडकी कार्यमुक्त करण्याची ही पहिलीच वेळ आहे

श्रीमती पाटील यापूर्वी दापोली येथील कोकण कृषि विद्यापीठात ‘कंपट्रोलर या पदावर १२ मे. २०२२ पासून कार्यरत होत्या. तिथेही वारंवार कामावर गैरहजर रहाणे, माउंट एव्हरेस्ट निधी संकलनात व्यस्त रहाणे, प्रत्येक बाबीत नकारात्मक भूमिका घेणे, अधिकारी, कर्मचाऱ्यांशी नीट न वागणे आदी तक्रारींवरून त्यांची बदली होऊन दि. ११, मार्च, २०२४ रोजी त्या जि. प. मध्ये मुख्य लेखा व वित्त अधिकारी म्हणून रुजू झाल्या होत्या. कामावर रुजू होताच त्या पुन्हा काही काळ रजेवर होत्या त्यांतर त्या पुन्हा हजर झाल्या. तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख यांच्या कारकिर्दीत हजर झाल्यापासून त्या वादग्रस्त ठरल्या होत्या त्यांच्या कामकाज पद्धतीवर अधिकारी व कर्मचारी तसेच कंत्राटदारही नाराज होते. अनेक महत्वाच्या बैठकांना त्या गैरहजर रहात असल्याच्या तक्रारी होत्या.

देशमुख यांच्या काळातील ‘किस्सा कुर्सीका’ हा तेव्हा बराच गाजला आणि आजही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये त्याची चर्चा ऐकायला मिळते. झालं असं की, सी ई ओ देशमुख यांच्या खुर्ची शेजारी दोन्ही बाजूला दोन-दोन अशा वार खुर्ध्या होत्या अतिरिक्त मु.का.अ.उप-मुका. अ. (सामान्य प्रशासन) प्रकल्प संचालक (डीआरडीए), व ‘कॅफो यांच्यासाठीच त्या होत्या. खाते प्रमुख व ‘बीडओ कॉन्फरन्स च्या वेळी अशीच बैठक व्यवस्था असायची मात्र देशमुख यांनी यातील दोन खुर्चा काढून टाकल्या. साहजिकच प्रकल्प संचालक आणि कॅफो यांनी आता समोर बसायचे होते. मात्र एका बैठकीच्या वेळी ‘कॅफो मॅडम समोर न बसता, बैठकीला उपस्थित न राहता निघून गेल्या. सीईओ संतप्त झाले आणि त्यांनी याबद्दल नापसंती व्यक्त केली आणि त्यांना समाज दिल्याचे जि. प. च्या सूत्रांकडून सांग यात आले. उप-मुख्य लेखा व वित्त अधिकारी बाळासाहेब पाटील आणि कॅफो मॅडम यांच्यातील तू तू मैं मै’ ला तर वित्त विभाग, अन्य खाते प्रमुख अधिकारी कर्मचारी आणि कंत्राटदार हे सर्व कंटाळले होतेच पण नव्याने आलेले ‘सीईओ खेबुडकर हेही कंटाळले आणि शेवटी त्यांना या सर्व प्रश्नात लक्ष घालणे भाग पडले त्यानंतर त्यांनी प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात केली.

जि. प. च्या गेल्या ४-५ वर्षांच्या कारभरातले अनेक किस्से आज कानावर पडताहेत. रंगतदार चर्चा सुरु आहे. देशमुख यांच्या बदलीनंतर मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नव्याने आलेले रवींद्र खेबूडकर यांनी या सर्व प्रकरणी गंभीर दाखल घेत त्यांना वेळोवेळी समज दिली असतानाही त्यांच्या वर्तनात सुधारणा होताना दिसत नाही हे लक्षात आल्यानंतर त्यांनी एके दिवशी वित्त विभागाला अचानक भेट दिली या भेटीत व तपासणीत अनेक बाबी समोर आल्या आणि त्यांनी कारवाईला सुरुवात केली. आणि प्रशिक्षणासाठी निघताना वरील आदेश जारी केले. दरम्यान कार्यमुक्त झाल्यानंतर आज दालनाबाहेर लावण्यात आलेली त्यांच्या नावाची पाटी काढून टाकण्यात आली आता उप-मुख्य लेखा व वित्त अधिकारी बाळासाहेब पाटील हे हा पदभार संभाळतील मात्र येत्या ३१, में, रोजी तेही निवृत्त होत आहेत

त्या ‘४० चेकचे’ काय..?
श्रीमती पाटील यांना कार्य मुक्तीचे आदेश मिळताच त्यांनी तात्काळ चार्ज सोडला खरा पण जाता जाता तब्बल ४० चेक वर त्यांनी आपल्या सह्याच केल्या नसल्याचे समोर आले आहे परिणामी वित्त विभाग आणि जि. प. प्रशासन चिंतेत आहे आता पुढे काय, यातून मार्ग कसा काढायचा असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. या गोंधळात ज्यांची ज्यांची पेमेंट अडकली आहेत तेही यामुळे चिंतेत आहेत.

error: Content is protected !!