फोंडाघाट (प्रतिनिधी) : श्री साईनाथ प्रासादिक भजन मंडळ, मुंबई सलग बाराव्या वर्षी श्री साई दर्शन सोहळा आणि श्री सत्यनारायण महापूजा हा कार्यक्रम बुधवार दिनांक १४ मे २०२५ रोजी घाडगेवाडी, परबवाडी, फोंडाघाट – गांगोवाडी येथे आयोजित केला आहे. या धार्मिक सोहळ्याचा पंचक्रोशीतील भाविकांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा आणि कार्यक्रम यशस्वी करावा असे आवाहन आयोजक हरिश्चंद्र घाडगे- अध्यक्ष, रामचंद्र घाटगे – कार्याध्यक्ष, विलास परब- सचिव,चंद्रकांत घाडगे- खजिनदार यांनी केले आहे.
दरवर्षी हा धार्मिक कार्यक्रम श्री साईनाथ प्रासादिक भजन मंडळ, मुंबई यांचे मार्फत आयोजित केला जातो. चालू वर्षी हे बारावे वर्ष त्यानिमित्ताने मंगळवार दिनांक १३ मे २५ रोजी सायंकाळी पाच वाजता श्री साई प्रतिमा मिरवणूक आणि रात्री नऊ वाजता सांस्कृतिक उद्घाटन सोहळा ! बुधवार दिनांक १४ मे २५ रोजी सकाळी दहा वाजता श्री सत्यनारायण महापूजा व श्री साईंचे पूजन दुपारी बारा वाजता महाआरती व तीर्थप्रसाद आणि महाप्रसाद सायंकाळी चार वाजता महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ व लकी ड्रॉ स्पर्धा सायंकाळी चार वाजता हरिपाठ व साईंची धुपारती, नऊ वाजता मंडळाचे सुस्वर संगीत भजन. दहा वाजता ओम वीरभद्र दशावतार नाट्य मंडळ ट्रस्ट भांडुप मुंबई यांचा महान पौराणिक नाट्यपुष्प पाषाण झाली कोकणभूमी असा उपक्रम आयोजित केला आहे तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन विष्णू बापू घाडगे व सतीश रामचंद्र घाडगे यांनी केले आहे…













