खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण पंचशील नगर येथील संघमित्रा महिला मंडळ खारेपाटण या मंडळाची सन २०२५ ते सन २०२८ ची नवीन कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आली असून या महिला मंडळाच्या अध्यक्षपदी संकिता संतोष पाटणकर तर सचिव पदी आस्था भूपेश पाटणकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. नवीन महिला पदाधिकाऱ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुक करण्यात येत आहे. संघमित्रा महिला मंडळ खारेपाटण या मंडळाची सभा नुकतीच ‘बुद्धविहार’ पंचशील नगर खारेपाटण येथे मंडळाच्या माजी अध्यक्ष आंकाशा संतोष पाटणकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. सदर सभेत संघमित्रा महिला मंडळाची पुढील ३ वर्षांकरिता नवीन कार्यकारणी जाहीर करण्यात आली. नव्याने निवडण्यात आलेली कार्यकारणी पुढील प्रमाणे —-
अध्यक्ष – संकिता संतोष पाटणकर, उपाध्यक्ष – सायली संतोष तुरळकर, उपाध्यक्ष – संजीवनी संतोष जुवाटकर, सचिव – आस्था भूपेश पाटणकर, सह सचिव – स्मिग्धा सागर पोमेडकर, खजिनदार – दीक्षा दिनेश पाटणकर, हिशोब तपासनीस – आंकांशा संतोष पाटणकर, संदेशवाहक – आश्विनी अशोक पाटणकर, संदेशवाहक – सारंगी संदीप पाटणकर, सल्लागार – दीपिका दीपक गोवळकर, सल्लागार – रोशनी रतन पाटणकर, कार्य. सदस्य – सुवर्ण रमेश पाटणकर नव्याने निवडण्यात आलेल्या महिला कार्यकारिणीचे संघमित्रा महिला मंडळ खारेपाटणच्या माजी अध्यक्ष आंकंशा संतोष पाटणकर व सचिव आरोही राहुल पाटणकर यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.











