श्री देव ब्राह्मण देव मंदिर चिंदर सडेवाडी येथील सत्यनारायण पूजेचे निमित्त
आचरा (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील चिंदर येथील श्री देव ब्राह्मण देव मंदिर चिंदर सडेवाडी (हडकरवाडी) येथे प्रतिवर्षाप्रमाणे आज 11 मे रोजी श्री सत्यनारायणाची महापूजा आयोजित करण्यात आली आहे. यानिमित्ताने विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी श्री सत्यनारायण महापूजा, दुपारी श्रीची आरती, तीर्थप्रसाद व महाप्रसाद, सायंकाळी ७ वाजता सुस्वर भजने होणार आहेत. त्यानंतर रात्रौ ठीक १० वाजता ब्राह्मणदेव नाट्य मंडळ चिंदर सडेवाडी निर्मित, लेखक मधुसूदन कालेलकर लिखित व संतोष सावंत दिग्दर्शित कौटुंबिक जिव्हाळ्याचे हृदयस्पर्शी, सामाजिक दोन अंकी नाटक “चांदणे शिंपीत जावे” सादर होणार आहे. नाट्यप्रयोगामध्ये नेपथ्य शरद कांबळी, रंगभूषा जितेंद्र तिरोडकर यांचे असून पार्श्वगायिका स्वरांगी मेस्त्री व पार्श्व संगीत संदीप मेस्त्री यांचे असणार आहे. यामध्ये प्रभा जोशी, हर्षदा बागायतकर, जुई तोरसोळकर, अर्पिता हडकर, मोरेश्वर गोसावी, मिथुन चिंदरकर, संतोष गोसावी, धोंडी चिंदरकर, संजय लोके, प्रफुल्ल फाटक, सतीश हडकर, सूर्यकांत हडकर या कलाकारांचा समावेश आहे. यामध्ये सूत्रधार देवेंद्र हडकर, प्रकाश मेस्त्री तर विशेष सहाय्यक दीपक सुर्वे, मनोज हडकर व सहाय्यक संदेश चिंदरकर, संतोष हडकर, दीप्ती गोसावी, सुप्रिया गोसावी हे कलाकार असणार आहेत.
तरी सर्व भाविक भक्तांनी तीर्थप्रसाद, दर्शनाचा लाभ घ्यावा तसेच नाट्यरसिकांनी नाट्यप्रयोगाचा आनंद घ्यावा असे आवाहन ब्राह्मणदेव सेवा मंडळ चिंदर सडेवाडी (हडकरवाडी) यांच्यावतीने करण्यात आले आहे.
