कणकवली (प्रतिनिधी) : महाराष्ट्र सरकारने पहिली ते चौथी तृतीय भाषा हिंदी ही अनिवार्य केली आहे पाचवी पासून हिंदी ही तृतीय भाषा आहे परंतु पहिली ते चौथी ला हिंदी भाषा महाराष्ट्रात महाराष्ट्र सरकार कडून अनिवार्य का?हिंदी भाषा तृतीय भाषा म्हणून १ली ते ४ थी च्या विद्यार्थ्यांना हिंदी भाषा शाळांनी शिकवू नये या बाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील शाळांना पत्र लिहिले आहे ते महाराष्ट्रातील मनसैनिक व पदाधिकारी यांनी शाळांच्या मुख्याध्यापक अथवा व्यवस्थापनाला भेटून हिंदी भाषा न शिकवण्याबद्दल चर्चा करून राज ठाकरे यांनी मुख्याध्यापक यांना दिलेले पत्र देण्याबाबत आदेश दिले त्यानुसार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिष्टमंडळाने कणकवली येथील विद्यामंदिर हायस्कूल प्राथमिक विभाग , पी एम श्री शाळा श्री सद्गुरू भालचंद्र महाराज पू.प्रा.शाळा नं.३ ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कणकवली तालुका अध्यक्ष शांताराम सादये, कणकवली शहराध्यक्ष योगेश कदम उपस्थित हाेते.
हिंदी भाषा सक्ती विरोधात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे मुख्याध्यापकांना पत्र
