प्रतिष्ठित व्यापारी दत्तात्रय उर्फ बाबा गोवेकर यांचे निधन…!

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरातील विद्यानगर येथील रहिवासी तथा प्रतिष्ठीत व्यापारी दत्तात्रय उर्फ बाबा गोविंद गोवेकर (७८) यांचे अल्पशा आजाराने रविवारी सायंकाळी निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा,सून,दोन मुली, भाऊ,जावई, भावजय, नातवंडे असा मोठा परिवार आहे. शहरातील विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये त्यांचा नेहमीच सहभाग असायचा. बाजरपेठेतील डी. जी. गोवेकर कंपनी किराणा मालाचे होलसेल विक्रेते होते. त्यांचा स्वभाव मीतभाषी होता. लिलाधर गोवेकर यांचे ते वडील,कलर व्यवसायिक सुभाष गोवेकर यांचे बंधू तर किराणा होलसेल व्यवसायिक हेमंत गोवेकर यांचे ते चुलते होत.

error: Content is protected !!