माजी नगरसेवक संताजी रावराणे पुरस्कृत आयोजन
वैभववाडी (प्रतिनिधी) : महाराष्ट्राचे मत्स्योद्योग आणि बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नामदार नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त वैभववाडी येथे सोमवार 23 जून रोजी सकाळी 11 वाजता महाराणा प्रताप कलादालन वैभववाडी येथे विविध सेवाभावी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. माजी नगरसेवक संताजी अरविंद रावराणे पुरस्कृत आणि आयोजनाने सामाजिक उपक्रमांनी पालकमंत्री नितेश राणे यांचा वाढदिवस साजरा केला जाणार आहे. वैभववाडी तालुक्यातील 70 वर्ष वयावरील जेष्ठ नागरिकांचा यथोचित सत्कार सोहळा संपन्न होणार आहे. वैभववाडी तालुक्यातील दहावी आणि बारावी परीक्षेत विशेष प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव, वाभवे- वैभववाडी नगरपंचायत मधील सर्व सफाई कामगारांना मोफत रेनकोट वाटप, वाभवे-वैभववाडी शहरातील सर्व प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांना मोफत वाह्यावटप करण्यात येणार आहे. माजी नगरसेवक संताजी रावराणे हे सलग 9 वर्षे नामदार नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम राबवत आहेत. भाजपाच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा सामाजिक उपक्रम संपन्न होणार असून यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन संताजी रावराणे यांच्याकडून करण्यात आले आहे.