युवा संदेश प्रतिष्ठान चे आयोजन
कणकवली (प्रतिनिधी) : पालकमंत्री नामदार नितेश राणे यांच्या वाढदिवसाच्या औचित्याने युवा संदेश प्रतिष्ठान च्या वतीने शनिवार दिनांक 21 जून 2025 रोजी सकाळी 10:00 वा माध्यमिक विद्यालय कनेडी, सांगवे येथे 10 वी आणि 12 वी मधील गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा व वह्या वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमात १० वी व १२ वी मधील प्रथम तीन क्रमांकाना आकर्षक भेटवस्तू देऊन गौरविण्यात येणार आहे. याच कार्यक्रमात वह्या वाटप कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात येणार आहे.
तरी सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन श्री संदेश ऊर्फ गोट्या सावंत आणि सौ संजना संदेश सावंत यांनी केले आहे.