कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे यांनी जेष्ठ नागरिकांशी साधला संवाद

आयजीपी दराडे यांच्या उपस्थितीत कणकवली पोलीस ठाणे येथे ज्येष्ठ नागरिक मेळावा उत्साहात संपन्न.

कणकवली (प्रतिनिधी) : मला अतिशय आनंद आहे की, एप्रिल महिन्यामध्ये याच ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांचा पहिला मेळावा उत्स्फूर्तपणे झाला होता याला चांगला प्रतिसाद तुम्ही दिला होता आणि या एप्रिल महिन्यात लावलेले छोटेसे रोपटे त्या रोपट्याचे आज वटवृक्षात रूपांतर होऊन आता त्याला फांद्या फुटत आहे. ज्येष्ठ नागरिक हेल्पलाइन उपक्रम हा दिवसेंदिवस वाढत असून ही हेल्पलाइन 24 तास सेवा देत आहे . आजपर्यंत 70 ते 80 हेल्पलाइनला ज्येष्ठ नागरिकांनी संपर्क साधला होता आणि त्यांचे निराकरण करण्यात आल्याचे समाधान आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या आहेत पण ती सुटली नाही असा एकही ज्येष्ठ नागरिक राहणार नाही याची दक्षता घेतली जाईल असे आश्वासन कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे यांनी ज्येष्ठ नागरिक मेळाव्यात बोलताना दिले.

कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे आज सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आले. त्यांच्या उपस्थितीत कणकवली पोलीस ठाणे येथे ज्येष्ठ नागरिक मेळावा संपन्न झाला. आज त्यांनी जिल्ह्यातील गुन्हे आढावा, कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतला.

यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.मोहन दहिकर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक कृषीकेश रावले, कणकवली उपविभागीय पोलिस अधिकारी घनश्याम आढाव,स्थानिक गुन्हा विभागाचे पोलीस निरीक्षक, तथा सह जनसंपर्क अधिकारी सचिन हुंदळेकर , कणकवली पोलीस निरीक्षक मारुती जगताप, तसेच ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचे माजी अध्यक्ष दादा कुडतरकर, ज्येष्ठ कणकवली तालुक्यातील ज्येष्ठ नागरिक आणि तालुक्यातील पोलीस पाटील उपस्थित होते.

error: Content is protected !!