मुंबई येथे आज पहाटे अल्पशा आजाराने निधन, रात्री मुलुंड येथील राहत्या घरापासून रात्री १० वाजता निघणार अंत्ययात्रा
वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुक्यातील एडगाव फौजदारवाडी येथील रहिवासी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी वित्त व बांधकाम सभापती जयेंद्र रावराणे यांचे थोरले बंधू तसेच जयभवानी शिक्षण प्रसारक मंडळाचे मिलिंद विद्यालय पवईचे संस्थापक, वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष, महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष सदानंद दत्ताराम रावराणे यांच्या पत्नी कै.शुभांगी सदानंद रावराणे यांचे आज पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले. आज रात्री १०.०० वाजता स्प्रिंग बिल्डिंग, हनुमान चौक, मुलुंड ईस्ट येथील त्यांच्या निवासस्थानापासून अंत्ययात्रा काढण्यात येणार आहे. जयेंद्र रावराणे व त्यांचे थोरले बंधू सदानंद रावराणे हे मुंबईसह सिंधुदुर्ग जिल्ह्यात शैक्षणिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यामुळे त्यांच्या पत्नीच्या निधनाने मुंबईसह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातून शोक व्यक्त केला जात आहे.












