नांदोस मधील जंगलमय भागात आढळला सडलेला मृतदेह

चौके (प्रतिनिधी) : तालुक्यातील नांदोस गावात जंगलमय भागात पुरुष जातीचा सडलेल्या अवस्थेतील मृतदेह सापडला आहे. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली आहे. मृतदेहाच्या काही भागाचे जंगली प्राण्यांनी लचके तोडल्यामुळे मृतदेहाची काही प्रमाणात वाताहात झाली आहे. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी येथील पोलिसांशी संपर्क साधत माहिती दिली आहे. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक एस. एस. खाडे, पोलीस कर्मचारी सुहास पांचाळ, कट्टा पोलीस दुरक्षेत्रचे श्री. मोरे घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरु आहे.

error: Content is protected !!