कणकवली (प्रतिनिधी) : दरवर्षीप्रमाणे याही वर्षी असलदे येथील दिविजा वृद्धाश्रम येथे आषाढी एकादशी निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमांमध्ये सकाळी १०.०० वाजता विठ्ठल रुक्मिणी मूर्तीचे पूजन, १०.३० वाजता ओशिवरा मणिकजी मनपा शिक्षक विठ्ठल भेट पथनाट्य, १०.४५ वाजता महिलांचे भजन, अकरा वाजता लेझीम नृत्य, ११.१५ वाजता वासुदेवाचे नृत्य, ११.३० वाजता दिंडीचे आयोजन करण्यात येणार आहे. वरील कार्यक्रम हे दिविजा वृद्धाश्रमाच्या पटांगणात साजरे होणार असून यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन दिविजा वृद्धाश्रम मार्फत करण्यात आले आहे.
दिविजा वृद्धाश्रमात आषाढी एकादशीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन










