कणकवली (प्रतिनिधी) :भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भाजपा जिल्हा सरचिटणीस मनोज रावराणे यांना मार्गदर्शनानुसार लोरे नंबर १ गावातील जिल्हा परिषद शाळेमध्ये तसेच हायस्कूल मध्ये विद्यार्थांना मोफत वह्या वाटप करण्यात आले.त्यावेळी गावातील सरपंच अजय रावराणे उपसरपंच सुमन गुरव.ग्रा.प.सदस्य नरेश गुरव,सुहास कासले,सुनील रावराणे,मारुती राणे,अनंत राणे,प्रकाश रावराणे,महेश रावराणे,भाऊ नवले, बाबु मांडवकर, अमित राणे आणि लोरे ग्रामस्थ उपस्थित होते.