खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील खारेपाटण गट विकास विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लिमिटेड खारेपाटण या शेतकरी सहकारी संस्थेच्या वतीने नुकतेच संस्थेच्या शेतकरी सभासद बांधवांना महाराष्ट्र शासन व केंद्र सरकार पुरस्कृत पंजाबराव देशमुख व्याज सवलत शेतकरी कर्जाच्या वाटपाचा शुभारंभ संस्थेचे चेअरमन श्री रवींद्र उर्फ बाळा जठार यांच्या प्रमुख उपस्थितीत संस्थेच्या कार्यालयात आज करण्यात आला.
यावेळी संस्थेचे व्हाईस चेअरमन श्री सुरेन्द्र कोरगावकर, संचालक श्री विजय देसाई,भाऊ राणे,अशोक पाटील, मंगेश गुरव, इस्माईल मुकादम,संदेश धुमाळे, संस्थेचे सचिव अतुल कर्ले आदी मान्यवर उपस्थित होते.
आर्थिक वर्ष ३१ मार्च संपल्यानंतर तातडीने सभासद शेतकऱ्यांना शेती कर्ज देणारी जिल्ह्यातील एकमेव संस्था म्हणून खारेपाटण गट विकास विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीचा जिल्ह्यात अग्रक्रम लागत आहे. जे शेतकरी मुदतीत कर्ज फेडतात अशा शेतकऱ्यासाठी हि व्याज सवलत कर्ज योजना असून सन २०२३- २४ वर्षांकरिता खारेपाटण सोसायटीच्या वतीने ३३९ शेतकरी सभासदांना सुमारे २ कोटी रुपये पर्यंतचे कर्ज वाटप करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे सचिव श्री रवींद्र उर्फ बाळा जठार यांनी यावेळी दिली. तरी या शेती कर्जाचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेचे सचिव श्री अतुल कर्ले यांनी शेतकरी सभासद बांधवांना केले आहे.