वेंगुर्त्यात 6 जुलैला भाजपतर्फे वारकरी बांधवांचा सन्मान

वेंगुर्ले (प्रतिनिधी) : आषाढी एकादशीचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टीतर्फे वेंगुर्लातील वारकरी बांधवांचा सन्मान सोहळा ६ जुर्ले रोजी सायं. ६ वाजता चांदेकर बुवा विठ्ठल मंदिर येथे आयोजित करण्यात आला आहे.

वेंगुर्ल्यात वारकरी संप्रदायाचे अनेक अनुयायी आहेत. श्रद्धेने या वारकरी बांधवांकडून विविध सेवा होत आहेत. आषाढी एकादशी, कार्तिकी एकादशी व अन्य उत्सवही साजरे केले जातात. दरवर्षी या बांधवांकडून पायी वारीचेही आयोजन करण्यात येते. श्रद्धा आणि संस्कृतीचे पाईक असलेल्या या वारकरी बांधवांचा सन्मान व्हावा या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या सन्मान सोहळ्याला वारकरी बांधव व विठ्ठलभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्न उर्फ बाळू देसाई यांनी केले आहे.

error: Content is protected !!