पोलीस हवालदार प्रकाश गवस याना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकपदी बढती

कणकवली (प्रतिनिधी) ; महामार्ग पोलीस केंद्र ओसरगाव येथे कार्यरत असलेले पोलीस हवालदार प्रकाश गवस यांना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकपदी बढती मिळाली आहे. कायदा आणि माणुसकी याचा समन्वय साधून आपले पोलीस दलातील कर्तव्य पार पाडणारा पोलीस अशी प्रकाश गवस यांची वेगळी ओळख पोलीस दलात आणि समाजात आहे.1993 साली सिंधुदुर्ग पोलीस दलात भरती झालेल्या प्रकाश गवस यांनी सुरुवातीला तत्कालीन पोलीस मुख्यालय सावंतवाडी येथे आपल्या पोलीस दलातील सेवेची सुरुवात केली. त्यांनतर सावंतवाडी पोलीस ठाणे, बांदा पोलीस ठाणे, देवगड पोलीस ठाणे, कणकवली पोलीस ठाणे येथे वाहतूक पोलीस म्हणून ड्युटी केली. आपल्या 32 वर्षाच्या सेवाकाळात आजवर गवस यांना विविध गुन्हे उघडकीस आणण्यात तसेच अन्य उल्लेखनीय कामगिरीसाठी 100 हुन अधिक रिवार्ड ने जिल्हा पोलीस अधिक्षकांकडून गौरविण्यात आले आहे. सन 2022 साली गवस याना महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील सर्वोच्च समजले जाणारे पोलीस महासंचालक पदकाने सन्मानित करण्यात आले आहे. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकपदी बढती झाल्याबद्दल प्रकाश गवस यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

error: Content is protected !!