छोट्या वारकऱ्यांनी एकादशी भारावली !
फोंडाघाट (प्रतिनिधी) : विठ्ठल विठ्ठल गजरी अवगी दुमदुमली पंढरी…..sss. विठू नामाच्या गजरात फोंडाघाट- माळवाडी, हवेली नगर शाळेतील छोट्या वारकऱ्यांनी शाळेमध्ये दिंडीने येऊन एक वेगळीच रंगत आणून दिली आषाढी एकादशी निमित्ताने मुलांनी वेगवेगळ्या वेशभूषा करून आपल्या कलागुणांना आणि हिंदू संस्कृतीचे दर्शन घडविले. शाळेचा परिसर विठू माऊलीच्या जयघोषाने दुमदुमून गेला यावेळी शिक्षिका मुख्याध्यापिका माधवी जोशी, सहशिक्षिका शितल भा बागवे,भाग्यश्री पाताडे, प्राची उरणकर,मयुरी मेस्त्री,सुलभा लाड यांचे सह पालक वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाला होता. शाळेमध्ये संस्कृतीचं शिक्षण प्रामुख्याने कार्यानुभवातून घेतल्यामुळे पालक वर्गामध्ये समाधान व्यक्त होत आहे.
