आचरा (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील पळसंब वरचीवाडी येथील विठ्ठल रखुमाई मंदिरात आज आषाढी एकादशी निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने मूळ आडवली येथील व कणकवली नायब तहसीलदार मंगेश यादव यांच्या हस्ते सपत्नीक विठ्ठल रखुमाईची प्रशासकीय पूजा करण्यात आली. यावेळी पंचक्रोशीतील सुप्रसिद्ध डॉ. सुरेश भोगटे, उपसरपंच अविराज परब, देवस्थान मानकरी आदी उपस्थित होते.

