स्थानिक स्वराज्य निवडणूक प्रारूप प्रभाग रचना | कणकवली तालुक्यात 21 जुलै पर्यंत हरकती सादर करता येणार

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : महाराष्‍ट्र जिल्‍हा परिषद व पंचायत समिती, अधिनियम 1961 चे कलम 12 पोटकलम (1) अन्‍वये सिंधुदुर्ग जिल्‍हा परिषद व पंचायत समितीच्‍या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी जिल्‍हा परिषद क्षेत्रातील निवडणूक विभाग व पंचायत समित्‍यांमधील निर्वाचक गण रचनेची प्रारूप अधिसूचना – महाराष्‍ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक – अ – कोकण विभागीय पुरवणी, सोमवार, जुलै14, 2025/आषाढ23, शके1947, असाधरण क्रमांक 32 अन्‍वये परिशिष्‍ट – 5(अ) व परिशिष्‍ट – 5(ब), तसेच परिशिष्‍ट – 4 , प्रारूप प्रभाग रचनेचा कणकवली तालुकयाचा नकाशा व सिंधुदुर्ग जिल्‍हयाचा नकाशा तहसिलदार कार्यालय कणकवली व पंचायत समिती कार्यालय कणकवलीच्‍या नोटीस बोर्डवर आज दिनांक 14/07/2025 रोजी प्रसिध्‍द करणेत आले आहे. 21 जुलै 2025 पर्यंत तहसिलदार कार्यालय मध्‍ये हरकती सादर करणेत याव्‍यात.

error: Content is protected !!