मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांची माहिती
ओरोस (प्रतिनिधी) : १ डिसेंबर २००५ पूर्वी नियुक्तीपत्र मिळालेल्या परंतु जुनी पेन्शन लागू नसलेल्या ४९ ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचा जुनी पेन्शन योजनेत समावेश केला आहे. या नियमाप्रमाणे अजून कोणी पात्र अधिकारी असतील त्यांचाही जुनी पेन्शन योजनेत समावेश करण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी सांगितले.
सोमवारी सायंकाळी मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी आपल्या दालनात पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल तनपुरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सई धुरी, जिल्हा पशु संवर्धन अधिकारी डॉ सुधाकर ठाकूर आदी उपस्थित होते. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील ४९ ग्रामपंचायत अधिकारी पात्र असतानाही जुनी पेन्शन योजनेपासून वंचित होते. त्यांची जुनी पेन्शन योजना लागू करण्याची सातत्याने मागणी होती. त्याची दखल घेवून या पात्र ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचा जुनी पेन्शन योजनेत समावेश करण्यात आला आहे, असे सांगितले.












