वैभववाडीत १८ग्रामपंचायतीवर असणार महीलाराज;अनेक इच्छुकांचे स्वप्न भंगले

वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुक्यातील ३४ग्रामपंचायतींच्या आगामी  सार्वत्रिक निवडणुकीतील सरपंच पदाचे आरक्षण जाहीर झाले असुन यामध्ये १८ग्रामपंचायतींवर महीलाराज असणार आहे. या आरक्षणामुळे अनेक गावांमधील दिग्गज इच्छुकांचे सरपंच बनण्याचे स्वप्न भंगले आहे. तर काहीनां लॉटरी लागणार आहे. तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या  सरपंच पदासाठीचे आरक्षण तहसीलदार सुर्यकांत पाटील यांनी जाहीर केले.तहसीलकार्यालयाच्या सभागृहात चिठ्ठीद्वारे ही सोडत पद्धत पार पडली. यावेळी निवासी नायब तहसीलदार दिलिप पाटील, शिवाजी सुतार, सचिन निकम, एस एस बाबर, कांचन मांजरेकर, बी टी मांजरेकर आदी अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. आरक्षण सोडतीच्या सुरवातीला अनुसूचित जातीसाठी तीन ग्रामपंचायती आरक्षित करण्यात आल्या. यामध्ये भुईबावडा, सडुरे -शिराळे या दोन ग्रामपंचायती महीलांसाठी व जांभवडे ही सर्वसाधारणसाठी आरक्षित करण्यात आली.

त्यानंतर नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी ९ चिठ्या काढण्यात आल्या. यामध्ये ५महीला व ४सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आल्या. त्यामध्ये मांगवली, कुसूर, तिरवडे तर्फ खारेपाटण, आखवणे-भोम, करूळ  या ग्रामपंचायतीवर महीला तर एडगांव, सोनाळी, सांगुळवाडी, नाधवडे या नामाप्र सर्वसाधारणासाठी आरक्षित झाल्या. तसेच उर्वरित २२ग्रामपंचायती या सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित झाल्या.यामध्ये  ११ ग्रामपंचायती महीला व ११ठिकाणी सर्वसाधारण आरक्षण जाहीर करण्यात आले. यामध्ये निमरुळे, नापणे, वेंगसर, कुंभवडे, मौदे, लोरे, उपळे, कोकिसरे, कोळपे, तिथवली आचिर्णे याठिकाणी महीला तर  हेत, नेर्ले, गडमठ, कुर्ली, उंबर्डे, नानीवडे, खांबळे,  अरुळे, नावळे, ऐनारी, तिरवडे तर्फ सौदळ, या ग्रामपंचायत खुल्या प्रवर्गासाठी आहेत.

या आरक्षण सोडती कु. क्रितिका पवार या इयत्ता दुसरीत शिकणाऱ्या मुलीच्या हस्ते सर्व चिठ्ठ्या उचललून करण्यात आली.यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष सुधीर नकाशे, नासीर काझी, उबाठा तालुका प्रमुख मंगेश लोके, संजय सावंत,  बंड्या मांजरेकर, रितेश सुतार, विलास नावळे, आकाराम नागप, पुंडलिक साळूंखे, हेमंत पाटील, तसेच तालुक्यातील सरपंच, व ग्रामस्थ उपस्थित होते.

तालुक्यातील संपूर्ण ग्रामपंचायतीचे आरक्षण पुढीलप्रमाणे आहे.

अनुसूचित जाती महिला भुईबावडा सडुरे शिराळे जांभवडे (सर्वसाधारण),

नागरिकांचा मागास प्रवर्ग
महीला : कुसूर, तिरवडे तर्फ खारेपाटण, मांगवली, कुसूर,आखवणे-भोम,करूळ ना.मा.प्र. (सर्वसाधारण ): एडगाव, सोनाळी, सांगुळवाडी, कोळपे.

सर्वसाधारण महीला निमरुळे, नापणे, वेंगसर, कुंभवडे, मौदे, लोरे, उपळे, कोकिसरे, कोळपे , तिथवली, आचिर्णे

सर्वसाधारण(खुला) :हेत, नेर्ले, गडमठ, कुर्ली, उंबर्डे, नानीवडे, खांबळे, अरुळे, नावळे, ऐणारी, तिरवडे तर्फ सौदल.

error: Content is protected !!