फोंडाघाट मधील महेश रेवडेकर यांचा मोकाट जनावराबाबत स्तुत्य उपक्रम !!!

आपलं जनावर,आपली जबाबदारी सर्व शेतकऱ्यांनी अमलात आणावी

उपक्रमाबद्दल आणि रेवडेकर यांचा ग्रामपंचायतीकडून सत्कार

फोंडाघाट (प्रतिनिधी) : फोंडाघाट मधील मोकाट फिरणाऱ्या जनावरचा प्रश्न जटिल होत आहे. याबाबत ग्रामपंचायतीने शेतकऱ्यांना व जनावरधारकांना आवाहन करूनही यात कोणतीही सुधारणा झालेली नाही. या पार्श्वभूमीवर गावातील सजग ग्रामस्थ व शेतकरी महेश रेवडेकर यांनी आपली स्वतःची मोकाट जनावरे पकडून, ती दाजीपूर येथील गगनगिरी महाराज मठ गोशाळेमध्ये स्वतः गाडीने पोहोच केली. या त्यांच्या स्तुत्य कामगिरीबद्दल ग्रामपंचायत द्वारे त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.

यावेळी बोलताना ग्रामस्थ संतोष टक्के यांनी रेवडेकर यांच्या उपक्रमाचे कौतुक करताना हा प्रयत्न सर्वच शेतकऱ्यांनी करावा अशी अपेक्षा व्यक्त केली. यामुळे निश्चितच गावातील शेतकऱ्यांना प्रेरणा मिळून आपली जनावरे मोकाट बाजारातून फिरणार नाहीत व ग्रामस्थांच्या तक्रारी येणार नाहीत,अशी आशा सरपंच सौ.संजना आग्रे यांनी व्यक्त केली.

error: Content is protected !!