वाळू वाहतूक करणारा डंपर काळसे येथे पलटी

साईड पट्टी खचल्याने अपघात

चौके (प्रतिनिधी) : मालवण कुडाळ मार्गावर वाळू वाहतूक करणारा MH- ०७ K – १३२६ हा डंपर काळसे येथे सायंकाळी ५ : ३० वाजता समोरील वाहनास बाजू देण्याच्या प्रयत्नात साईडला गेला असताना रस्त्याची साईडपट्टी खचून रस्त्याच्या कडेला छोट्या ओढ्यात पलटी होऊन अपघातग्रस्त झाला. सुदैवाने चालकास दुखापत झाली नाही. पण पलटी झालेल्या डंपर मधील वाळू मात्र ओढ्यातील पाण्यात वाहून गेली आणि डंपरचेही नुकसान झाले.

दरम्यान सायंकाळी ७ वाजता दोन जेसीबी मशीन च्या सहाय्याने अपघात ग्रस्त डंपर बाहेर काढण्यात यश आले, या दरम्यान या मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. काळसे ते नेरुरपार दरम्यानच्या रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडले असून हे खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नातही वारंवार अपघात होत आहेत. तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने सदर खड्डे बुजवावेत अशी मागणी होत आहे.

error: Content is protected !!