कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ मुंबईच्या ७१ व्या वर्धापन दिनाच्या औचित्याने रक्तदान शिबिराचे आयोजन

कणकवली (प्रतिनिधी) : कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई संचलित माध्यमिक विद्यामंदिर कनेडी, श्री.मोहनराव मुरारीराव सावंत ज्युनि.कॉलेज ऑफ आर्ट्स ॲण्ड काॅमर्स कनेडी,श्री. तुकाराम शिवराम सावंत ज्युनि.कॉलेज ऑफ सायन्स कनेडी आणि बालमंदिर कनेडी यांच्या वतीने वार- शनिवार, दिनांक- १२ जुलै २०२५ रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई या संस्थेची स्थापना दिनांक ४ जुलै १९५४ रोजी कनेडी या ठिकाणी करण्यात आली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाची सोय उपलब्ध करून देण्यासाठी या शिक्षण संस्थेची स्थापना झाली.आज या शिक्षण संस्थेने जिल्हा व राज्यस्तरावर उत्तुंग झेप घेत नावलौकिक मिळवला आहे.

गेल्या ७१ वर्षातील शिक्षण संस्थेची घोडदौड ही वाखाण्याजोगी आहे, दरवर्षी शिक्षण संस्थेच्या मार्फत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते. “रक्तदान जीवनदान” रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे, एखाद्या गरजू व्यक्तीला रक्त देऊन आपण त्याचे प्राण वाचू शकतो.ज्यामुळे त्याला जीवनदान मिळते. रक्तदान शिबिराचे आयोजन सामान्यतः रक्तदात्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि गरजू लोकांना रक्त उपलब्ध करून देण्यासाठी केले जाते. हाच उदात्त हेतू ठेवून दरवर्षी संस्था रक्तदान शिबिराचे आयोजन सातत्याने करत आहे.

रक्तदान शिबिराच्या उद्घाटनासाठी प्रमुख उपस्थिती शिवाजी सावंत (क.ग.शि.प्र.मंडळ, सरचिटणीस), संदेश सावंत (माजी अध्यक्ष, जि.प.सिंधुदुर्ग व संचालक क.ग.शि.प्र मंडळ), व्ही. बी.सावंत (संचालक, क. ग. शि.प्र.मंडळ) आर.एच. सावंत (शालेय समिती, चेअरमन) आदी मान्यवर व पदाधिकारी यांच्या उपस्थिती सरस्वती मातेचे दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

रक्तदान शिबिरासाठी ब्लड बँक कर्मचारी ओरस, सिंधुदुर्ग यांचे नेहमीच मोलाचे सहकार्य लाभते. त्याबद्दल कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई यांच्याकडून त्यांना गुलाब पुष्प देऊन शुभेच्छा दिल्या. या रक्तदान शिबिरात डॉ.गजानन मोतीफळे, रक्त संक्रमण अधिकारी, डॉ. नागेश खूपसे, निवासी वैद्यकीय अधिकारी, नितीन समाजसेवक अधीक्षक वैद्यकीय, श्रीमती प्रांजली परब, अधिपरिचारिका, पवन आनंद, रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी, कु. ऋतुजा हरमलकर, सहाय्यक तंत्रज्ञ, नितीन गावकर, वाहन चालक, सागर सावंत परिचर प्रथमेश घाडी परिचर, डॉ. अजित तेरेसा प्रशिक्षणार्थी डॉक्टर, डॉ. नंदू अजय कुमार प्रशिक्षणार्थी डॉक्टर, डॉ. राहुल यादव प्रशिक्षणार्थी डॉक्टर, डॉ. सफना सागर प्रशिक्षणार्थी डॉक्टर यांनी रक्तदान शिबिरातील रक्तदात्यांची नोंदणी, तपासणी व रक्त संकलन उत्तम प्रकारे केले.

या रक्तदान शिबिरामध्ये कनेडी पंचक्रोशीतील प्रशालेचे माजी विद्यार्थी, हितचिंतक व पालक तसेच प्रशालेचे शिक्षक यांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले. यामध्ये १५ रक्तदात्यांनी आपला सहभाग नोंदवत रक्तदान केले.सदर रक्तदान शिबिरासाठी कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी भेट देत रक्तदात्यांची चौकशी करत शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमासाठी प्रशालेतील मुख्याध्यापक तथा प्राचार्य सुमंत दळवी, पर्यवेक्षक बयाजी बुराण, सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रसाद मसुरकर सर यांनी केले.

error: Content is protected !!