भालचंद्र ज्वेलर्स दुकान फोडले ; लाखोंच्या रोकडसह सोन्याचांदीचे दागिने लंपास

चौघे चोरटे सीसीटीव्ही फुटेजमध्ये रेकॉर्ड

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरातील तालुका स्कुल समोरील सना कॉम्प्लेक्स मधील मंगेश तळगावकर यांच्या मालकीच्या भालचंद्र ज्वेलर्सला चोरट्यानी लक्ष्य केले असून बुधवार 16 जुलै रोजी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास चोरी केली. चोरीच्या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांनी सहकारी पोलिसांसह घटनास्थळी जाऊन प्राथमिक पाहणी केली. सना कॉम्प्लेक्स मध्ये राहणारे डॉ केळकर याना पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास भालचंद्र ज्वेलर्स चे शटर खोलल्याचा आवाज आला. डॉ केळकर यांनी तातडीने तळगावकर यांना मोबाईल द्वारे शटर चा आवाज येत असल्याचे सांगितले. तळगावकर हे काही वेळातच दुकानजवळ पोचले. मात्र तत्पूर्वीच चोरांनी दुकानात सना कॉम्प्लेक्स सोसायटी ची ठेवलेली लाखोंची रोकड, सोन्या चांदीचे दागिने लंपास करून पसार झाले होते.सीसीटीव्ही फुटेज मध्ये चोरी होत असताना रेकॉर्ड झाले असून एकूण चार संशयित चोर असल्याचे दिसून येत आहे. तिघे चोर दुकानात होते तर एक दुकानाबाहेर थांबून असल्याचे दिसून येत आहे. चोरी करून चोरटे सना कॉम्प्लेक्स च्या मागील बाजूने पराष्टेकर यांच्या बंगल्याच्या दिशेने सोनगेवाडी रस्त्याच्या दिशेने पळून गेले असावेत. चोरी करून जाताना सना कॉम्प्लेक्स च्या मागील बाजूस चांदीच्या दागिन्यांचा बॉक्स टाकलेला सापडून आल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान या चोरीच्या घटनेने कणकवली शहरात खळबळ उडाली असून चोरीचा गुन्हा उघड करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

error: Content is protected !!